स्वालिया न. शिकलगार
अनेकदा दिवसभर धावपळीनंतर पायांच्या तळव्यांमध्ये प्रचंड उष्णता/ जळजळ जाणवते
जाणून घ्या याची कारणे आणि सोपे घरगुती उपाय.
यामागे शरीरात व्हिटॅमिन बी-१२/ आयर्नची कमतरता, मधुमेह, रक्ताभिसरण मंदावणे अशी कारणे असू शकतात
दिवसभर घट्ट पादत्राणे वापरल्यामुळे देखील रात्री पाय धगधगण्याची समस्या होऊ शकते
एका मोठ्या भांड्यात थंड पाणी घेऊन त्यात १५ मिनिटे पाय बुडवून ठेवा
यामुळे पायांची जळजळ शांत होते. तळव्यांवर थेट बर्फ ठेवणे टाळा
रात्री झोपण्यापूर्वी कोमट खोबरेल तेल/एरंडेल तेलाने तळव्यांची मालिश करा
यामुळे पायांचे रक्ताभिसरण सुधारते आणि उष्णता कमी होते.
बाऊलमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात २ चमचे ॲपल सायडर व्हिनेगर मिसळा
या पाण्यात काही मिनिटे पाय ठेवून बसा. यामुळे पायांमधील पीएच संतुलन होते
हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. रात्री कोमट दूधामध्ये चिमूटभर हळद घालून प्या