Buff Tip Moth : तुम्हीच ओळखा, लाकडाचा तुकडा की फुलपाखरु

Namdev Gharal

निसर्गातील काही किटक छलावरणात इतके माहिर असतात की आपल्या डोळयांना विश्वास बसणार नाही

या पैकीच एक आहे बफ टिप मॉथ नावाचे फूलपाखरू, हे फुलपाखरु झाडाच्या फांदीवर बसले तर फांदी कोणती व फूलपाखरु कोणते हे ओळखूनच येत नाही

याचा फायदा या फूलपाखरला होतो झाडाच्या तुटलेल्या फांदीसारखा दिसत असल्यामुळे पक्ष्यांपासून स्वतःचं संरक्षण करतो.

त्याच्या पंखांवर राखाडी, तपकिरी आणि फिकट पांढऱ्या रंगांचा संगम असतो. पंखांच्या टोकांवर हलका पिवळसर भाग असतो, म्हणून त्याला "Buff Tip" असं नाव दिलं गेलं आहे.

पूर्ण वाढ झालेला पतंग सुमारे ५ सें.मी. एवढ्या पंखांच्या रुंदीचा असतो.याचे आणखी वैशिष्ट्ये म्हणजे हा केवळ रात्रीचा उडतो व प्रकाशाकडे आकर्षित होतो.

बफ टिप पतंगाची अळी पिवळ्या आणि काळ्या पट्ट्यांनी सजलेली असते. ती झाडांची पाने (विशेषतः बाभूळ, ओक, विलो) खाते.

दिवसा हा झाडाच्या खोडावर अगदी स्थिर बसून राहतो. त्यामुळे तो झाडाच्या फांदीत पूर्णपणे मिसळतो आणि लक्षातच येत नाही.

अळी अवस्थेनंतर ती मातीखाली कोषावस्थेत (pupa) जाते आणि काही महिन्यांनी पूर्ण पतंग बनतो.

अनेक नैसर्गिक छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमी Buff Tip Moth चं छुपं रूप पाहून थक्क होतात — कारण तो खरोखर तुटलेल्या फांदीसारखा भासतो!

बफ टिप पतंग निसर्गातील "स्वतःला लपवण्याचं सर्वोत्तम उदाहरण" मानला जातो.

Snake Mimic Caterpillar | सापाचे रुप घेऊन घाबरवणारा सुरवंट