पुढारी वृत्तसेवा
कोरफडीचा गर (Aloe Vera)
घराबाहेर पडण्यापूर्वी चेहऱ्याला ताज्या कोरफडीचा गर लावा, यामुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि सूर्याच्या किरणांपासून संरक्षण होते.
काकडीचा रस
काकडीचा रस नैसर्गिक टोनर म्हणून काम करतो; उन्हात जाण्यापूर्वी तो चेहऱ्यावर लावल्याने त्वचा हायड्रेटेड राहते.
नारळ तेल
त्वचेला आर्द्रता देण्यासाठी आणि सूर्याच्या अतिनील किरणांचा प्रभाव कमी करण्यासाठी खोबरेल तेलाचा हलका थर लावा.
चंदन पावडरचा लेप
चंदनाचे गुणधर्म त्वचेला थंड ठेवतात, ज्यामुळे उन्हामुळे होणारी जळजळ आणि रॅशेस थांबतात.
टोमॅटो पल्प
टोमॅटोमध्ये लायकोपीन असते, जे नैसर्गिक सनस्क्रीनप्रमाणे काम करते आणि टॅनिंग रोखण्यास मदत करते.
गुलाब पाणी
घराबाहेर पडताना चेहऱ्यावर गुलाब पाण्याचा स्प्रे मारल्याने ताजेतवाने वाटते आणि त्वचेचा पीएच (pH) स्तर टिकून राहतो.
सुती कपड्यांचा वापर
सनस्क्रीनऐवजी पूर्ण बाह्यांचे सुती कपडे, स्कार्फ आणि टोपी वापरून त्वचेचे थेट उन्हापासून संरक्षण करा.
मुलतानी माती
आठवड्यातून दोनदा मुलतानी मातीचा पॅक लावल्याने उन्हामुळे खराब झालेली त्वचा पुन्हा सतेज होते.पूर्वी महागड्या सनस्क्रिनऐवजी त्वचेसाठी हे उपाय नक्की करा