डेली रुटीनमुळे थकल्यासारखं वाटतंय? कामातला तोचतोचपणा दूर करण्यासाठी फॉलो करा 'या' ५ गोष्टी

मोनिका क्षीरसागर

लहान ब्रेक घ्या: कामाच्या दरम्यान दर तासाला ५ ते १० मिनिटांचा छोटा ब्रेक घेतल्याने मनावरचा ताण कमी होतो.

छंद जोपासा: तुमच्या आवडीचे काम, जसे की गाणी ऐकणे किंवा वाचन करणे, यामुळे दिवसाची सुरुवात उत्साही होते.

निसर्गाच्या सानिध्यात जा: थोडा वेळ मोकळ्या हवेत चालल्याने किंवा बागेत बसल्याने मेंदूला ताजेतवाने वाटते.

कामाचे नियोजन करा: दररोजच्या कामाची यादी (To-do list) बनवल्यामुळे गोंधळ उडत नाही आणि कामाचा कंटाळा येत नाही.

डिजिटल डिटॉक्स: ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त मोबाईल आणि लॅपटॉपपासून काही काळ लांब राहण्याचा प्रयत्न करा.

पुरेशी झोप घ्या: शरीराची आणि मनाची मरगळ झटकण्यासाठी रात्री ७-८ तासांची शांत झोप अत्यंत आवश्यक आहे.

नवे काहीतरी शिका: कामात तोचतोचपणा येऊ नये म्हणून दर आठवड्याला एखादी नवीन गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करा.

पाणी भरपूर प्या: अनेकदा डिहायड्रेशनमुळे थकवा जाणवतो, त्यामुळे दिवसभर स्वतःला हायड्रेटेड ठेवणे महत्त्वाचे आहे.

येथे क्लिक करा...