पुढारी वृत्तसेवा
तणाव फक्त त्रासदायक नसून तो मेंदूची दुरुस्तीही करू शकतो, असा दावा जर्मनीतील प्रसिद्ध 'मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट ऑफ सायकियाट्री'च्या शास्त्रज्ञांनी केला आहे.
तणावाशी संबंधित 'CRH' हे संप्रेरक मेंदूला झालेल्या इजेनंतर दुरुस्ती यंत्रणा सक्रिय करण्याचे काम करते, असे नवीन संशोधनात आढळले.
मेंदूला इजा झाल्यानंतर अवघ्या काही तासांत CRH सक्रिय होते आणि सुमारे ३ दिवसांत ते शांत होते.
CRH हे संप्रेरक मेंदूच्या नसांचे रक्षण करणाऱ्या 'मायलिन' थराची पुन्हा निर्मिती करण्यास मदत करते.
दुखापत होताच मेंदूतील विशेष पेशी वेगाने नवीन कवच (मायलिन) तयार करतात आणि मेंदूचे कार्य पुन्हा सुरळीत करतात.
तणावाचे हे संकेत सतत दबावासारखे काम न करता, दुरुस्ती प्रक्रिया वेगाने सुरू करणाऱ्या एका 'स्टार्टिंग पिस्तूल'सारखे कार्य करतात.
जी यंत्रणा शरीराला तणावाची सूचना देते, तीच आपत्कालीन वेळी मेंदूसाठी "दुरुस्तीचा सिग्नल" ठरते असे नवीन संशोधनात स्पष्ट झाले आहे.
नवीन संशोधनामुळे नैराश्य आणि मानसिक आजारांवर भविष्यात नवीन उपचारांचे मार्ग खुले होण्याची शक्यता आहे.