पुढारी वृत्तसेवा
Mindfulness जर्नलमध्ये ध्यानावर झालेल्या नवीन संशोधन प्रकाशित झाले आहे.
आजवर अनेक संशोधनांमध्ये सिद्ध झाले आहे की, ध्याना दरम्यान मेंदूचे फ्रंटल (Frontal) आणि पेरिएटल (Parietal) क्षेत्र सक्रिय होतात.
मात्र या प्रक्रियेत अल्फा आणि थिटा ब्रेन वेव्हज (Brain Waves) नक्की किती लवकर सुरू होतात, हे आतापर्यंत स्पष्ट नव्हते.
हेच समजून घेण्यासाठी National Institute of Mental Health and Neurosciences च्या संशोधकांनी एक अभ्यास केला.
ध्यानावरील संशोधनासाठी तीन गट करण्यात आले.
अभ्यासात स्पष्ट झाले की, सर्व लोकांमध्ये मेंदूतील बदलांचा काळ जवळजवळ समान होता, परंतु अनुभवानुसार ब्रेन वेव्हजची ताकद वेगवेगळी होती.
अनुभवी लोकांच्या ध्यानाचा मेंदूमध्ये बदल अवघ्या ३० सेकंदात दिसू लागतो.
ध्यान करताना सर्वात शक्तिशाली बदल ७ ते १० मिनिटांच्या दरम्यान दिसून आले.
संशोधकांच्या मते, मेडिटेशनचा परिणाम खूप लवकर सुरू होऊ शकतो. हा परिणाम व्यक्तीच्या अनुभवावर अवलंबून असतो.