पुढारी वृत्तसेवा
संशोधनानुसार, व्यायामामुळे मेंदूचे आकारमान टिकवून ठेवण्यास, रक्ताभिसरण सुधारण्यास आणि दाहक प्रक्रिया नियंत्रित राहण्यास मदत होते.
व्यायामामुळे स्नायू आणि मेंदू यांच्यात थेट संवाद साधला जातो. स्नायू सक्रिय आणि तंदुरुस्त राहिल्यास त्याचा सकारात्मक परिणाम मेंदूवर होतो.
व्यायामाचे विविध प्रकार मेंदूवर वेगवेगळे परिणाम करतात; मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे शारीरिक हालचालींमध्ये सातत्य राखून ती जीवनशैलीचा भाग बनवणे.
संशोधनानुसार, आठवड्यातून किमान १५० मिनिटे मध्यम तीव्रतेचा एरोबिक व्यायाम उपयुक्त ठरतो. रेझिस्टन्स ट्रेनिंगमुळे मेंदूचे रक्षण करणारे रेणू तयार होण्यास मदत होते.
कॅनडातील 'क्वीन्स युनिव्हर्सिटी'च्या प्राध्यापक फर्नांडा डी फेलिस यांच्या मते, अगदी सामान्य गतीने चालणे देखील मेंदू आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
"'इंटरमिटंट फास्टिंग'मुळे मेंदूच्या पेशींचे संरक्षण होण्यास मदत होऊ शकते." मात्र, मानवी मेंदूवरील दीर्घकालीन फायद्यांबाबत अधिक संशोधन सुरू आहे.
इंटरमिटंट फास्टिंग सारख्या उपवास पद्धतीत शरीरातील चरबीचे रूपांतर 'केटोन्स'मध्ये होते. हे मेंदूला पर्यायी ऊर्जा पुरवते आणि पेशींचे रक्षण करण्यास मदत करते.
संशोधनानुसार, व्यायाम आणि इंटरमिटंट फास्टिंग दोन्ही पेशींना सौम्य आव्हान देतात, तर झोप व विश्रांतीमुळे पेशींची दुरुस्ती होऊन रोगांशी लढण्याची क्षमता वाढते.