Bor Health Benefits : हृदय ते पचनासाठी गुणकारी! बोरात दडलाय आरोग्याचा महाखजिना

पुढारी वृत्तसेवा

बोराचे मूळ स्थान भारत असून अगदी रामायण काळापासून बोरांचा उल्लेख आढळतो. हे फळ आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते.

थंडीच्या ऋतूत बोरांचा मोसम सुरू होतो. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून योग्य प्रमाणात बोरांचे सेवनाने हृदयाचे आरोग्यास पुरक आहे.

सौवीरबोरे (मोठी बोरं) थंड व वीर्यवर्धक असतात, तर चणीबोरे वात आणि पित्तनाशक मानली जातात. प्रत्येक प्रकारच्या बोराचे शरीराला वेगळे फायदे होतात.

महर्षी चरक आणि सुश्रुत यांच मतानुसार बोरं वात-पित्तशामक, रक्तपित्तहारक आहे.

बोर सेवन सर्दीला पायबंद घालणारी आहेत. याचे सेवन पचनासाठीही लाभदायक आहे.

बोराच्या बीमधील भाग खोकला, तहान, उलटी, उचकी आणि शरीरातील दाह कमी करण्यासाठी अत्यंत औषधी ठरतो.

बोराच्‍या सालीचा छोटा तुकडा तोंडात ठेवून त्याचा रस हळूहळू चघळल्यास बसलेला आवाज २ ते ३ दिवसांत पूर्ववत होतो.

बोरे पाण्यात उकळून तयार केलेला काढा थोडी साखर घालून प्यायल्यास ताप आणि उष्णतेचे विकार लवकर दूर होतात.

बोराच्या पानांचा किंवा सालीचा काढा करून त्याने गुळण्या केल्यास तोंड येणे, हिरड्या ठिसूळ होणे या समस्यांपासून आराम मिळतो.

बोरं जास्त प्रमाणात खाल्ल्यास खोकला होऊ शकतो. तसेच कच्ची बोरं पचायला जड असल्याने ती खाणे टाळावे.

येथे क्‍लिक करा.