Benefits of 10000 steps a day : रोज १०,००० पावले चालणे खरोखरच गरजेचे आहे का?

पुढारी वृत्तसेवा

दररोज १०,००० पावले चालावे हा विचार आजही लोकप्रिय आहे, पण प्रत्येकासाठीच हे गरजेची आहे का?

जपानी भाषेत 'मॅनपो' म्हणजे १०,००० पावले. १९६५ मध्ये जपानी कंपनीने 'मॅनपो-केई' नावाचा पेडोमीटर (पावले मोजण्याचे यंत्र) विकले. याच्‍या जाहिरातीतून ही '१०,००० पावलांची' जादूई आकडेवारी जगात पसरली.

आरोग्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी संशोधकांनी गेल्या काही वर्षांत पावलांच्या वेगवेगळ्या लक्ष्यांचा अभ्यास केला आहे.

दररोज २,००० पावले चालल्‍याने अकाली मृत्यूचा धोका ८% ते ११% पर्यंत कमी होत असल्याचे 'जामा'च्या अभ्यासात आढळले आहे.

गंभीर आजारांना आळा! दररोज १०,००० पावले चालल्यामुळे डिमेंशिया (स्मृतीभ्रंश), हृदयविकार आणि कर्करोगाचा धोका टळण्यास मदत होते.

'द लॅन्सेट पब्लिक हेल्थ' २०२५ च्या सर्व्हेक्षणानुसार, १०,००० पावले पूर्ण होण्याआधीच चालण्याचे अप्रतिम आरोग्यदायी फायदे मिळण्यास सुरुवात होते.

युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीमधील संशोधनानुसार, दररोज ७,००० पावले चालल्याने अकाली मृत्यूचा धोका ४७% आणि डिमेंशियाचा धोका ३८% पर्यंत कमी होतो!

प्रत्येकासाठी वास्तववादी ध्येय: नियमित चाणार्‍यांसाठी १०,००० पावले, तर इतरांसाठी ७,००० पावले चालणे ठरते अधिक सोयीस्कर!

तज्ज्ञांचे मते, दररोज किती पावले चालावे यावर 'एकसमान उत्तर' नाही. संशोधनानुसार, दररोज ४,००० ते १०,००० पावले चालल्यानेही आरोग्याला पुरेसे फायदे मिळू शकतात.

येथे क्‍लिक करा.