Bollywood celebrity divorce rumours: बॉलीवुडमधील 'या' जोडप्यांच्या घटस्फोटाच्या अफवा नेहमीच पसरतात, काय आहे सत्य

पुढारी वृत्तसेवा

सेलिब्रिटींच्या घटस्फोटाच्या बातम्या किंवा अफवा अनेकदा चर्चेत असतात.

काही स्टार जोडपी अशी आहेत, ज्यांच्या ब्रेकअपच्या अफवा मोठ्या प्रमाणात पसरल्या होत्या, तरीही त्यांनी एकमेकांचा हात सोडला नाही.

यापैकी काही जोडप्यांना अजूनही इंडस्ट्रीतील सर्वात मजबूत आणि आवडते जोडपे मानले जाते.

शाहरुख आणि गौरी

१९९१ ला लग्न झाले. त्यांचे नाते काळाच्या कसोटीवर उतरले, अनेक चढ-उतार आले, तरीही ते एकमेकांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत.

अभिषेक आणि ऐश्वर्या

गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या वैवाहिक जीवनात दुरावा आणि घटस्फोटाच्या अफवा पसरत आहेत. परंतु अलीकडेच एका प्रसंगातून ही अफवा असल्याचे सिद्ध केले.

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण

'कॉफी विथ करण'मधील दीपिकाच्या डेटिंग स्टेटमेंटमुळे बरेच वाद निर्माण झाले. पण दोघांनीही या अफवांना स्पष्टपणे नकार दिला.

गोविंदा आणि सुनीता आहुजा

यांच्या लग्नाला ३८ वर्षे झाली. घटस्फोटाच्या बातम्यांमुळे दोघेही बऱ्याच काळापासून चर्चेत. सध्या देखील याची जोरदार चर्चा आहे. परंतु अद्याप याबाबात कोणतेही स्पष्टीकरण समोर आलेले नाही.

येथे क्लिक करा...