इम्रान खानच नव्हे, बॉलिवूडचे ‘हे’ स्टार्सही आहेत परदेशी नागरिक

पुढारी वृत्तसेवा

इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस!

बॉलिवूडमधील इतर कोणत्या कलाकारांकडे आहे परदेशी नागरिकत्व?

इम्रान खान

अमेरिकेत जन्मलेल्या इम्रान खानकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे. मुंबईतील आंदोलनानंतर त्याला देश सोडण्याची नोटीस मिळाली आहे.

कतरिना कैफ

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कतरिना कैफचा जन्म हाँगकाँगमध्ये झाला. तिच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व असल्याचे सांगितले जाते.

अक्षय कुमार

अक्षय कुमारकडे अनेक वर्षे कॅनडाचे नागरिकत्व होते. मात्र, २०२३ मध्ये त्याने पुन्हा भारतीय नागरिकत्व मिळवले.

आलिया भट्ट

आलिया भट्टकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे. आई सोनी राजदान ब्रिटिश नागरिक असल्यामुळे आलियाच्या नागरिकत्वाचा विषय अनेकदा चर्चेत येतो.

दीपिका पदुकोण

दीपिका पदुकोणचा जन्म डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे झाला. मात्र, तिच्याकडे डेन्मार्कचे नागरिकत्व असल्याचा दावा केला जात होता मात्र तिच्याकडे भारतीय पासपोर्ट आहे.

नरगिस फाखरी

‘रॉकस्टार’ चित्रपटातून प्रसिद्ध झालेल्या नरगिस फाखरीचा जन्म अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये झाला. ती अमेरिकन अभिनेत्री आणि मॉडेल आहे.

नोरा फतेही

नोरा फतेहीचा जन्म कॅनडातील टोरंटो येथे झाला. कॅनेडियन पार्श्वभूमी असलेली नोरा आपल्या नृत्यामुळे आणि अभिनयामुळे भारतात लोकप्रिय झाली.

परदेशी नागरिकत्व असूनही बॉलिवूडमध्ये यश

परदेशी नागरिकत्व असलेले अनेक कलाकार भारतीय चित्रपटसृष्टीत काम करतात. मात्र, भारतात राहणे आणि काम करणे यासाठी लागू असलेले कायदे व परवानग्या पाळणे आवश्यक असते.

उकडलेले की मसाला ऑम्लेट? कोणते अंडे सर्वात जास्त आरोग्यदायी?

Eggs | File Photo
येथे क्लिक करा