स्वालिया न. शिकलगार
जुळलेल्या भुवया, सावळा रंग असला तरी काजोलला सिने प्रेक्षक वर्गाने खूप पसंती दिली
गुप्त, दिल वाले दुल्हनिया ले जाएँगे, बाजीगरमध्ये तिचं सावळं रुप लक्ष वेधून घेत होतं
पण कालांतराने तिचा चेहरा उजळू लागला. आज तिची ग्लोईंग स्किन आहे
यामागे तिने सर्जरी केली, इंजेक्शन्स घेतले आणि महागडी औषधेही खाल्ल्याच्या चर्चा रंगल्या
अभिनेत्री डेटॉक्स, डर्मल फिल्टर करतात, ज्यामुळे त्वचेचा रंग उजळतो, अशा गोष्टींचे काजोलने स्वत: खंडन केलं आहे
तिने कुठलीही सर्जरी केली नाही. तिने सांगितले की, ती उन्हापासून स्वत:चे संरक्षण करते
ज्यामुळे तिचा रंग उजळला आणि रुपडं बदललं
काजोलने हे देखील सांगितलं की, तिचे आयब्रो, हेअरस्टाईल आणि ड्रेसिंग सेन्समध्ये बदल झाला आहे