Boiled Egg Vs Omelette | उकडलेले अंडे की ऑम्लेट: वजन कमी करण्यासाठी काय खावे?

पुढारी वृत्तसेवा

संपूर्ण अंडे खाणे सुरक्षित आणि पौष्टिक आहे. पिवळ्या बलकात व्हिटॅमिन A, D, E, B12, कोलीन आणि इतर महत्त्वाचे पोषक घटक असतात

जर तुम्हाला चव आणि विविधता हवी असेल, तर आठवड्यात काही दिवस उकडलेले अंडे आणि काही दिवस कमी तेलातील व्हेज ऑम्लेट खाऊ शकता

उकडलेल्या अंड्या अतिरिक्त तेल किंवा बटर लागत नाही. त्यामुळे १ मोठ्या अंड्यामधून सुमारे 70–80 कॅलरीज मिळतात

उकडलेले अंडे खाल्ल्यास पोट जास्त वेळ भरलेले राहते, त्यामुळे वारंवार भूक लागत नाही. परिणामी वजन कमी होण्यास मदत होते

ऑम्लेटमध्ये पालक, टोमॅटो, कांदा, ढोबळी मिरची, मशरूम यांसारख्या भाज्या घालून अधिक पौष्टिक बनवता येते

ऑम्लेटमधून प्रथिनांसोबत फायबरही मिळते, त्यामुळे पोट अधिक वेळ भरलेले राहते

केवळ वजन कमी करण्याचा विचार असेल, तर उकडलेले अंडे थोडे अधिक फायदेशीर ठरते, कारण त्यात अतिरिक्त तेल नसते

मात्र, कमी तेलात भरपूर भाज्या घालून बनवलेले ऑम्लेट देखील तितकाच चांगला आणि पौष्टिक पर्याय आहे

येथे क्लिक करा