Black Pepper Adulteration | काळी मिरीत भेसळ कशी ओळखाल? ‘या’ सोप्या ट्रिक्सने होईल उघड

पुढारी वृत्तसेवा

काळी मिरीत भेसळ का केली जाते?
काळी मिरी महाग असल्यामुळे नफा वाढवण्यासाठी व्यापारी अनेकदा त्यात भेसळ करतात.

पपईच्या बिया – सर्वात सामान्य भेसळ
काळ्या मिरीसारख्या दिसणाऱ्या पपईच्या बिया मोठ्या प्रमाणावर मिसळल्या जातात.

हलक्या वजनाच्या कृत्रिम बिया
काही वेळा प्लास्टिक किंवा रासायनिक पदार्थांपासून बनवलेल्या नकली बियाही वापरल्या जातात.

पाण्यात टाकून ओळखा खरी मिरी
काळी मिरी पाण्यात टाकल्यावर तळाशी बसते, तर पपईच्या बिया पाण्यावर तरंगतात.

चवीवरून कशी ओळखाल भेसळ?
खरी काळी मिरी तिखट, उग्र आणि थोडी कडू लागते; भेसळीत ती चव नसते.

हाताने दाबून तपासा
खरी मिरी दाबल्यावर लगेच चुरगळत नाही; भेसळीतल्या बिया पटकन फुटतात.

आगीची चाचणी करा
भेसळीत प्लास्टिक असल्यास ती जळताना वितळते किंवा विचित्र वास येतो.

भेसळयुक्त मिरीचे आरोग्यावर परिणाम
पचन बिघडणे, अॅसिडिटी, पोटदुखी आणि दीर्घकाळात विषबाधा होऊ शकते.

सुरक्षित काळी मिरी कशी खरेदी करावी?
विश्वसनीय ब्रँड, प्रमाणित दुकाने आणि शक्यतो साबुत मिरीच खरेदी करा.

<strong>येथे क्लिक करा</strong>