मोनिका क्षीरसागर
अनेकवेळा ताप आल्यानंतर जिभेची चव जाते. तोंडात काहीही घालण्याची इच्छा होत नाही
तापात पचनशक्ती कमी होते. अन्न नीट पचत नसल्यामुळे शरीरात आम / विषारी पदार्थ तयार होतात
तापात डिहायड्रेसनमुळे तोंड कोरडे पडते. लाळ कमी होते त्याचा परिणाम जिभेच्या संवेदनांवर होतो.
सर्दी - खोकला असेल तर सतत तोंडात कफाचे आवरण असते
रसनेंद्रिय म्हणजेच टेस्ट सेन्सर आपले काम नीट करू शकत नाहीत.
या सगळ्यामुळे जिभेच्या संवेदना बदलतात. मग एकतर तोंड कडू पडते किंवा तोंडाची चव जाते.