पुढारी वृत्तसेवा
कारल्याचा रस रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो, तसेच मूत्रपिंडांची गाळणी (फिल्टरिंग) प्रक्रिया सुधारतो
तज्ज्ञांच्या मते, ज्यांना आधीपासूनच मूत्रपिंडांचे आजार आहेत, त्यांनी कारल्याचा रस नियमित आहारात समाविष्ट करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
कारला किंवा मोमॉर्डिका चारँशिया या फळापासून तयार होणारा कारल्याचा रस जगभरात लोकप्रिय आरोग्यवर्धक पेय मानले जाते
कारल्याचा रस फोलेट, झिंक, पोटॅशियम आणि लोह यांसारख्या अनेक स्थूल (मॅक्रो) व सूक्ष्म (मायक्रो) पोषक घटकांनी युक्त आहे
कारल्याच्या रसाचा वापर अनेक पारंपरिक उपचारपद्धतींमध्ये, जसे की आयुर्वेद आणि पारंपरिक चिनी औषधोपचारांमध्ये, दीर्घकाळापासून केला जात आहे
अभ्यासानुसार, कारल्याचा रस टाइप २ मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतो
कारल्याच्या रसात प्रोव्हिटॅमिन ‘ए’ असल्याने निरोगी त्वचा आणि जखम लवकर भरून येण्यासाठी उपयुक्त ठरतो. त्वचेचे तेज वाढण्यास मदत होते
कारल्याचा रस अतिप्रमाणात घेतल्यास पोटदुखी, जुलाब, पोट बिघडणे अशा आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात
काही प्राथमिक संशोधनांमध्ये मूत्रपिंडांच्या आरोग्यासाठी कारल्याचा रस उपयुक्त ठरतो, मात्र, दीर्घकाळ कारल्याच्या सप्लिमेंट्समुळे मूत्रपिंडांचे नुकसानही होऊ शकते