अविनाश सुतार
केळीच्या पानांत नैसर्गिक फायबर व अँटीऑक्सिडंट घटक असतात. यामुळे अपचन, आम्लपित्त, गॅस कमी होतो, आतड्यांची हालचाल सुधारते बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो
शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करतो, यकृत (लिव्हर) स्वच्छ ठेवण्यास मदत होते, रक्तातील घाण व टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास सहाय्य, त्वचेवरही सकारात्मक परिणाम दिसून येतात
रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त असून केळीच्या पानांतील पोटॅशियमयुक्त घटक उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात, हृदय निरोगी राहण्यास हातभार लावतात ताणतणाव कमी करण्यास सहाय्यक ठरतात
नियमित आणि मर्यादित प्रमाणात घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो, इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्यास सहाय्य करतो
केळीच्या पानांत अँटी-बॅक्टेरियल व अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, सर्दी, खोकला, संसर्गापासून संरक्षण होते, वारंवार आजार पडण्याचे प्रमाण कमी होते
हा रस कॅलरीजमध्ये कमी असल्याने भूक नियंत्रणात राहते, पचन सुधारल्याने चरबी साठणे कमी होते, नैसर्गिक पद्धतीने वजन घटवण्यास मदत होते
केळीच्या पानांचा रस रक्तशुद्धी करून त्वचा उजळण्यास मदत करतो, मुरुम, पुरळ कमी होण्यास सहाय्य करतो, केसगळती कमी करून केस मजबूत बनवतो
कोवळ्या, स्वच्छ केळीच्या पानांचा रस काढून सकाळी उपाशीपोटी 10–20 मि.ली. रस घ्यावा, आठवड्यातून 2 ते 3 वेळा घेतल्यास फायदेशीर ठरतो
गर्भवती महिला, गंभीर आजार असलेल्यांनी लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन रस घ्यावा, अति प्रमाणात सेवन टाळावे, रस काढण्यासाठी नेहमी ताजे व स्वच्छ पान वापरावे