Birds Navigation: ना रडार... ना कम्पास तरी नेमकं कुठं जायचंय हे पक्षांना कसं कळतं?

Anirudha Sankpal

ऋतू बदलतो तसे जगातील अनेक पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात पोहचतात.

मात्र या पक्षांकडे ना कोणती अत्याधुनिक दिशा दर्शक उपकरणे किंवा रडार असतात तरी ते दर वेळी अचूक त्याच ठिकाणी कसे काय पोहचतात.

चला तर मग जाणून घेऊयात पक्षांच्या या अचूक प्रवासामागचं शास्त्रीय कारण....

पक्षी हे एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना पर्वत किंवा डोंगर याचा आधार घेत नाहीत तर ते समुद्र किनारा, नद्या आणि पाणथळ जागांचा लँडमार्क म्हणून वापर करतात.

आता पक्षांची दिशा का भरकटत नाही ते पाहुयात... पक्षांना उपजतच उत्तर अन् दक्षिण दिशेची माहिती असते. काही पक्षांच्या डोक्यामध्ये magnetite असतात. त्यामुळं त्यांना पृथ्वीच्या मॅग्नेटिक फिल्डची माहिती होते.

पक्ष्यांच्या दृष्टीत (Vision) चुंबकीय क्षेत्रामुळे उत्तर आणि दक्षिण या दिशा दोन तेजस्वी बिंदू (Bright Spots) म्हणून दिसतात, ज्यामुळे त्यांना योग्य दिशेने मार्गदर्शन मिळते.

पक्षी हे अत्यंत हुशार असतात. ते दिवसा सूर्याच्या वक्रीमार्गाचा वापर करतात. याद्वारे त्यांना वेळेची देखील माहिती मिळते. रात्री ते ताऱ्यांच्या सहाय्याने आपले मार्गक्रमण करत असतात. ते ध्रुव तारा हे मुख्य लँडमार्क म्हणून वापरतात.

विशिष्ठ जातीचे पक्षी वेग वेगळा मार्ग निवडत असतात. अनेकजण एकाच मार्गावर कायम प्रवास करत असतात. मात्र sand martins सारखे काही पक्षी हे वेगवेगळ्या ऋतूत वेगळा मार्गाने मार्गक्रमण करतात.

या प्रवासादरम्यान ते ऋतुनुसार उपलब्ध असलेलं अन्न खातात अन् खराब हवामानापासून देखील स्वतःचा बचाव करतात.

येथे क्लिक करा