पुढारी वृत्तसेवा
घरात पंचमुखी हनुमानजींचा फोटो लावणे खूप शुभ मानले जाते.
मात्र फोटो लावताना योग्य दिशेची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे.
वास्तुशास्त्रानुसार, पंचमुखी हनुमानजींचे चित्र लावण्यासाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा उत्तम मानली जाते.
पंचमुखी हनुमानाचे चित्र लावल्याने घरातील सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्तींचा नाश होतो.
पंचमुखी हनुमानाच्या प्रतिमेमुळे घरात सकारात्मक उर्जेचा संचार होतो. मनोबलही वाढते. नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते.
पंचमुखी हनुमानाचा फोटो घरी ठेवल्याने जीवणात अपार यश मिळते. हनुमानजींच्या कृपेने सर्व संकटे दूर होतात.
वास्तुशास्त्रानुसार पंचमुखी हनुमानजींचे चित्र बेडरूममध्ये ठेवू नये.
पंचमुखी हनुमानजींचा फोटो घरात योग्य दिशेने ठेवल्याने घरात सुख, शांती, समृद्धी येते. मनातील भीती दूर होते तसेच रात्री वाईट स्वप्नांना प्रतिबंधित करते. वास्तुदोषांपासूनही मुक्तता मिळू शकते अशी भक्तांची धारणा आहे.