पुढारी वृत्तसेवा
'व्हाईट-थ्रोटेड निडलटेल' (White-throated Needletail) हा ताशी १६९ किमी वेगाने सातत्याने उडू शकतो. जगातील सर्वात वेगवान उडणारा पक्षांपैकी तो एक आहे.
त्याचे सिगारच्या आकाराचे शरीर आणि लांब टोकदार पंख याला प्रचंड वेग देतात.
'व्हाईट-थ्रोटेड निडलटेल' हा आपले जवळजवळ संपूर्ण आयुष्य हवेतच घालवतो. हवेतच कीटक पकडतो आणि हवेतच झोपूही शकतो.
हा पक्षी पूर्व आशियामध्ये आढळतो, खडकाळ कडे आणि जंगलांमध्ये घरटी बांधतो.
या पक्षाचे पंख लांब आणि टोकदार असतात आणि शेपटी लहान असते.
या पक्षाची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे त्याचा पांढरा शुभ्र गळा आणि त्याच्या बाजूला एक विशिष्ट 'यू' आकाराचा पांढरा पट्टा.
हा पक्षी तो आपल्या हवाई कसरतींसाठी ओळखला जातो आणि अनेकदा आकाशात उंच गोल फिरताना दिसतो.
'व्हाईट-थ्रोटेड निडलटेल'ची शक्तिशाली उड्डाणशैली त्याला इतर पक्ष्यांपासून वेगळे करते.