Namdev Gharal
वारंवार पाणी पिण्याची इच्छा होणे हे मधुमेहाचे एक लक्षण असू शकते. तुमच्या रक्तातील अतिरिक्त साखर तुमच्या टिशूमधून द्रव्यपदार्थ शोषूण घेते, यामुळे तुम्हाला वारंवार तहान लागते
हे ही तुम्ही प्री-डायबेटीक असू शकतात याचे लक्षण आहे. वाढलेली शुगर किडनीचे कार्य बिघडवते, तुम्हाला वारंवार लघवीला जाण्याची भावना तयार होते.
ब्लडशुगर वाढल्यास तुम्हाला विनाकारण थकवा येतो शरीर सुस्त राहते. वारंवार ही लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्रांना दाखवलेले योग्य ठरेल
शुगरमुळे दृष्टीवर परिणाम होते. वाढलेले साखरेचे प्रणाण डोळयांच्या बाहूल्यांवर परिणाम करते. त्यांची कार्यक्षमता कमी होऊन दृष्टी कमजोर होते व अंधूक दिसू लागते.
रक्तातील साखरेच्या प्रमाणामुळे कोणतीही छोटीशी जखम भरुन येण्यास वेळ लागतो. रक्तशर्करेमुळे शरिराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
हे एक शुगर पेशंटचे लक्षण असू शकते, चेहरा, मानेभोवती, काखेत येणारे काळे डाग हे प्री- डायबेटीकचे लक्षण असू शकते.
सतत खावेसे वाटणे किंवा वारंवार भूक लागणे हेही साखर वाढल्याचे लक्षण असू शकते. इन्सूलिन रेझिस्टंन्समूळे पेशींमध्ये गुक्लोज जात नाही त्यामुळे वारंवार भूक लागल्या सारखे वाटते.
हातापायत टोचल्याची भावना होणे, मुंग्या येणे, किवा पायाच्या तळव्यांमध्ये सुन्नपणा जाणवने हेही प्री डायबेटीकचे लक्षण असू शकते.
वजन अचानक वाढणे किंवा कमी होणे हे एक मधुमेहाची लक्षण असू शकते.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास नेहमी चिडचिडेपणा होतो किंवा अचानक उदासही वाटू शकते.