Bhindi Benefits : भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? 'हे' ८ फायदे वाचून थक्क व्हाल!

पुढारी वृत्तसेवा

रोज सकाळी कोवळ्या भेंड्या खाल्ल्याने शरीराला भरपूर शक्ती मिळते आणि दुर्बलता दूर होते.

भेंडीच्या मुळात साखर घालून खाल्ल्यास आमवात (Rheumatoid Arthritis) आणि सांधेदुखीच्या त्रासात आराम मिळतो.

भेंडीचे ताजे बी वाटून त्यात साखर घालून प्यायल्याने मधुमेहामुळे (Diabetes) होणारी शरीरातील जळजळ कमी होते.

भेंडीमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि आयर्न यांसारखे महत्त्वाचे पोषक घटक असतात.

भेंडीमध्ये मुबलक प्रमाणात असणारी जीवनसत्त्वे 'ए' (Vitamin A) आणि 'सी' (Vitamin C) रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.

कोवळ्या भेंड्या पचनास अत्यंत हलक्या असून तोंडाला रुची आणतात आणि शरीराचे पोषण करतात.

भेंडीतील पोटॅशियम आणि कॅल्शियम हाडे मजबूत ठेवण्यास आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

भेंडीचे गुणधर्म शरीरातील दाह कमी करून उष्णतेच्या विकारांपासून सुटका करतात.

खोकला, मंदाग्नी आणि वायूचा (गॅस) विकार असणाऱ्या व्यक्तींनी भेंडीचा अतिवापर टाळावा.

येथे क्‍लिक करा.