पुढारी वृत्तसेवा
व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्सने भरपूर आवळा ! १०० ग्रॅम आवळ्यात ६००-७०० मिग्रॅ व्हिटॅमिन C असते, जे पांढऱ्या रक्तपेशींची कार्यक्षमता वाढवते.
दह्यातील गुड बॅक्टेरिया (Probiotics) पचनक्रिया सुधारून प्रतिकारशक्ती मजबूत करतात.
आल्यातील अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म शरीराची सूज आणि इन्फेक्शन कमी करण्यास मदत करतात. चहा, सूप किंवा आमटीमध्ये नक्की वापरा.
लिंबू व्हिटॅमिन C चा उत्तम स्त्रोत! लिंबू आणि इतर सायट्रस फळे (संत्री, मोसंबी) शरीराला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचवतात.
भोपळ्याच्या बिया झिंक, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्सचा खजिना! सॅलड किंवा ओट्सवर टाकून खाल्ल्यास जखमा भरणे आणि प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
ताज्या हळदीमध्ये 'कर्क्युमिन' अधिक असते. हे अँटीऑक्सिडंट जळजळ कमी करून इम्युनिटी बूस्ट करते.
पालक आणि इतर पालेभाज्यांमध्ये जीवनसत्त्वे, फायबर आणि खनिजे मुबलक असतात, जे संपूर्ण शरीराचे पोषण करतात.
एक लाल शिमला मिरची तुम्हाला दिवसभरासाठी आवश्यक असलेले व्हिटॅमिन C आणि बीटा-कॅरोटीन सहज पुरवू शकते.
स्ट्रॉबेरी असो वा ब्लूबेरी, यातील पॉलीफेनॉल पेशींचे रक्षण करतात.