Bhimbetka |भीमबेटका: मानवी इतिहासाची चित्रमय गाथा

Namdev Gharal

मध्यप्रदेशातील रायसेन जिल्‍ह्याया एक असे स्‍थान वसले आहे की जे मानवाच्या प्रागैतिहासिक कालखंडात घेऊन जाते.

हे ठिकाण भोपाळपासून ४५ किलोमिटर अंतरावर आहे. विंध्य पर्वतरांगामध्ये याचा शोध लागला

याठिकाणी ७५० गुहा (rock shelters) असून, आदीमानवांनी याठिकाणी आपला इतिहास चित्रमय रुपात रेखाटला आहे.

यातील ५०० हून अधिक गुहांमध्ये भित्तीचित्रे (rock paintings) आढळून येतात. ही जागा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट आहे.

चित्रांमध्ये मृग, सांबर, हत्ती, बायसन, शिकारी लोक, नृत्य करणारे लोक, युद्ध प्रसंग अशा विविध दृश्यांचे चित्रण केले गेले आहे.

ही चित्रे मानवी उत्‍क्रांतीच्या ३०,००० वर्षांपूर्वीपासून १००० ई.पू. पर्यंतच्या कालखंडातील मानली जातात

त्‍या काळातील गुहा चित्रकला आणि दगडी आश्रयस्थाने आपल्‍यााला तत्‍कालिन मानवी समाजजीवनाची ओळख करुन देतात.

ही चित्रे व पाषाणयुग, मध्यपाषाणयुग व नवपाषाणयुगाच्या मानवी संस्कृतींचा मागोवा घेतात

भीमबेटका हे भारतातील सर्वात प्राचीन मानवी वस्तीचे पुरावे दर्शवणारे स्थळ मानले जाते.

पांडवांपैकी भीमाचा इथे वास होता, अशी लोककथा आहे – "भीम-बैठका" म्हणजे भीमाचे बसण्याचे स्थान. यावरुन भीमबेटका नाव पडले आहे.

Dholavira : भारतातील प्राचीन शहर!