Dholavira : इजिप्तच्या पिरॅमिडच्या काळात वसलेले भारतातील प्राचीन शहर!

Namdev Gharal

धोलाविरा हे प्राचीन भारतीय संस्‍कृती मूळं असलेले शहर आहे याचा शोध १९६० साली लागला

गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यात, रण ऑफ कच्छमधील खडीर बेटावर हे शहर वसले होते

याठिकाणी इजिप्तचे पिरॅमिडच्या काळातील संस्‍कृती वसली होती, जवळपास ५००० वर्षे जूनी

अंदाजे इ.स.पू. 3000 ते 1500 या कालावधीत हे शहर अस्तित्वात होते.

1960 ला या ठिकाणाचा प्रथम शोध लागला व 1990 साली याठिकाणी उत्‍खनन सुरु झाले

१२० एकर परिसरात हे शहर वसले आहे, तज्ञांच्या मते १५०० वर्षे येथे मानवी वस्‍ती होती. नंतर ती लयाला गेली.

हे हडप्पा संस्कृतीचा एक भाग असून, भारतातील सर्वात महत्त्वाच्या पुरातत्त्वीय स्थळांपैकी एक मानले जाते.

या शहराचे वैशिष्‍ट्ये म्‍हणजे ड्रेनेज सिस्टीम : याठिकाणी नाले प्रणाली आढळते, जी त्यावेळच्या प्रगत नागरी व्यवस्थेचे प्रतीक आहे

त्‍याचबरोबर शहरात जलसंधारणासाठी अद्वितीय जलव्यवस्थापन प्रणाली होती यासाठी तलाव, विहिरी यांची व्यवस्‍था केली होती.

या शहराला मजबूत भिंती होत्या आणि नियोजनबद्ध रस्ते व मुख्य प्रवेशद्वार होते.

2021 मध्ये धोलाविराला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे.

Egypt Pyramids : इजिप्तच्या पिरॅमिडचे सर्वात मोठे रहस्‍य उलगडले? | File Photo
Egypt Pyramids