Bhimashankar significance|सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं भीमाशंकर इतकं महत्वाचं का आहे?

स्वालिया न. शिकलगार

जगभरातील १२ जैवविविधता हॉटस्पॉटपैकी एक सह्याद्रीच्या जंगलात भीमाशंकर आहे

पुणे जिल्ह्यातील खेड-आंबेगाव तालुक्याच्या सीमेवर भीमाशंकर वसले आहे.

पश्चिम महाराष्ट्राची जीवनवाहिनी भीमा नदीचा उगम याठिकाणीच आहे

दक्षिण-पश्चिम दिशेत वाहत ती रायचूर जिल्ह्यातीव कृष्णा नदीला मिळते

१२ ज्योतिर्लिंगांपैकी भीमाशंकर हे ६वे ज्योतिर्लिंग मानले जाते,

अद्भूत हेमाडपंथी वास्तुकला असणारे भीमाशंकर मंदिर थक्क करणारे आहे.

येथील 'गुप्त भीमाशंकर', हनुमान तलाव देखील पर्यटकांना खुणावतो.

भीमाशंकरचे अभयारण्य आणि 'शेकरू'साठी हवेशीर घर आहे.

हे जंगल पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात पसरलेले आहे

दुर्मिळ औषधी वनस्पतींचा खजिना असलेले हे जंगल वन्यजीवांचे आश्रयस्थान आहे.

बिबट्या, कोल्हा, सांबर, भेकड, रानडुक्कर, माकडे, माउस डीयर, खवले मांजर आढळते

स्थानिक प्रजातींचे सरपटणारे प्राणी, उभयचर, फुलपाखरे, कीटक आढळतात.

पावसाळ्यात झाडांवर शेवाळ, वेगवेगळ्या वनस्पती (एपिफाइट्स) दिसतात

विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी चमकणारे बायोल्यूमिनसेंट कवक (चमकणारी बुरशी) दिसते

क्लिक करा आणि संपूर्ण माहिती पहा