स्वालिया न. शिकलगार
'भारत भाग्य विधाता' हा हिंदी चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे
या चित्रपटात एकापेक्षा एक मराठी अभिनेत्रींचा अभिनय पाहायला मिळणार आहे
चित्रपटात अभिनेत्री गिरीजा ओक, स्मिता तांबे, सुहिता थत्ते, ईशा डे दिसणार आहेत
या मराठमोळ्या अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत
'भारत भाग्य विधाता'च्या ट्रेलर लाँच सोहळ्यातील काही सुंदर क्षण समोर आले आहेत
या अभिनेत्रींचा साडीतला सुंदर लूक सध्या व्हायरल होतोय
गिरीजा पिवळ्या साडीत तर ईशा डे देखील सुंदर सिल्क साडीत दिसली
स्मिता तांबेचाही लूक लक्षवेधी ठरला, नेटकऱ्यांनी या लूक्सना भरभरून दाद दिली आहे