स्वालिया न. शिकलगार
भागम भागचा सीक्वल भागम भाग २ ची सध्या चर्चा होतेय
भागम भाग-२ चे राज शांडिल्य दिग्दर्शक असून आता चित्रपटात मीनाक्षी चौधरीची एंट्री झालीय
साऊथची क्वीन आता या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय
ती अक्षय कुमार सोबत मुख्य भूमिकेत असून तिने आपला अनुभव शेअर केला
रिपोर्टनुसार, ती म्हणते-'मी अशी स्क्रिप्ट शोधत होते, जी फॅमिलीला आवडेल, त्याचवेळी ही ऑफर मिळाली'
'मी पहिला भाग पाहिला होता तो मला खूप आवडला होता. म्हणून मी सीक्वलचा भाग बनले'
'अनेक स्क्रिप्ट्स मला आवडले नाहीत. पण भागम भाग २ परफेक्ट टायमिंग आहे'
'शुद्ध मजेशीर कहाणी आणि प्रत्येकाला पाहता येईल, असा चित्रपट आहे'