Must-Visit Destinations | आशियातील 'ही' ५ शहरे आहेत पर्यटनासाठी सर्वोत्तम!

पुढारी वृत्तसेवा

आशिया खंडातील काही शहरे ही संस्कृती, निसर्ग, आधुनिकता यांचे एक अप्रतिम मिश्रण आहेत.

आशियामध्ये फिरायला जाण्यासाठी नेमकी कोणती वेळ चांगली आहे, हे तुम्ही कोणत्या देशाला भेट देऊ इच्छिता यावर अवलंबून असते.

जाणून घेऊया यावर्षी पर्यटनासाठी आशियातील सर्वात लोकप्रिय ठरलेल्या ५ शहरांबद्दल

इंडोनेशियातील बाली हे निसर्गप्रेमींसाठी बाली हे नंदनवन आहे. इथले सुंदर समुद्रकिनारे, हिरवेगार भातशेतीचे मळे, शांत योगा सेंटर्स आणि इथली संस्कृती पर्यटकांना नेहमीच भुरळ घालते.

आधुनिक तंत्रज्ञान आणि जुन्या परंपरा एकाच वेळी अनुभवायच्या असतील, तर टोकियो शहर आदर्श आहे. येथील खाऊगल्ल्या आणि शिस्तबद्ध जीवनशैली पाहण्यासारखीच.

फिलिपिन्‍समधील पालावान हे वॉटर स्पोर्ट्स) आवडणार्‍यांसाठी उत्तम शहर आहे. येथील पारदर्शक पाणी आणि चुनखडीचे उंच कडे पाहणे हा एक थरारक अनुभव ठरतो.

सध्याच्या तरुणाईचे आवडते ठिकाण म्हणजे सोल! के-पॉप म्युझिक, लेटेस्ट फॅशन, ऐतिहासिक राजवाडे आणि चविष्ट स्ट्रीट फूडसाठी हे शहर प्रसिद्ध आहे.

निसर्गाच्या कुशीत वेळ घालवण्यासाठी श्रीलंका हा उत्तम पर्याय आहे. सोन्यासारखे चमकणारे समुद्रकिनारे, चहाचे मळे आणि वन्यजीव पर्यटनाचा अनुभव स्‍मरणीय करतात.

येथे क्‍लिक करा.