Hair Oil Tips | सकाळी की रात्री: केसांच्या उत्तम वाढीसाठी तेल कधी लावावे?

पुढारी वृत्तसेवा

केस गळणे, केस पातळ होणे, कोंडा आणि कोरडेपणा या समस्या आजही कॉमन आहेत. केसांना तेल लावणे हा सर्वात लोकप्रिय घरगुती उपाय मानला जातो

तेल सकाळी लावावे की रात्री? हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. याचे उत्तर प्रत्येकाच्या केसांच्या प्रकारावर आणि टाळूच्या स्थितीवर अवलंबून असते

रात्री झोपण्यापूर्वी केसांना तेल लावल्यास ते टाळूमध्ये अधिक वेळ राहते. हलक्या हाताने ५ ते १० मिनिटे मसाज केल्यास रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते

यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळण्यास मदत होऊ शकते. दुसऱ्या दिवशी सकाळी सौम्य शॅम्पूने केस धुतल्यास अतिरिक्त तेल निघून जाते

केसांच्या वाढीसाठी तेल किंचित कोमट करून लावल्यास ते सहज पसरते. बोटांच्या टोकांनी हलक्या हाताने ५ ते १० मिनिटे मसाज करा

विशेषतः तेलकट टाळू, कोंड्याची समस्या किंवा त्वचेवर पुरळ येण्याची प्रवृत्ती असल्यास जास्त वेळ तेल ठेवणे काहींना त्रासदायक ठरू शकते

जर रात्री तेल लावणे शक्य नसेल, तर केस धुण्याच्या ३० मिनिटे ते २ तास आधी तेल लावणे हा देखील चांगला पर्याय आहे

आठवड्यातून १ ते २ वेळा तेल लावणे बहुतेक लोकांसाठी पुरेसे असते. खूप जास्त तेल लावल्याने फायदा होत नाही; उलट ते धुणे कठीण जाऊ शकते

नियमित पण मर्यादित प्रमाणात तेल वापरणे, संतुलित आहार घेणे आणि केसांची योग्य काळजी घेणे हेच निरोगी केसांसाठी अधिक प्रभावी ठरते

येथे क्लिक करा