Calories Burn | एक कप चहा पिल्यास कॅलरी कमी करण्यासाठी किती चालावे?

पुढारी वृत्तसेवा

एका कप चहामुळे किती कॅलरी मिळतात, हे त्यात काय घातले आहे यावर अवलंबून असते. त्यानुसार कॅलरी खर्च करण्यासाठी किती चालावे लागेल हे ठरते

साखर नसलेल्या काळ्या चहात 2–5 कॅलरी असतात, तर साखर नसलेल्या दुधाच्या चहात 20–40 कॅलरी असतात

1 टीस्पून साखर घातलेल्या दूध असलेल्या चहात 45–60 कॅलरी असतात, तर 2 टीस्पून साखर घातलेल्या दूध असलेल्या चहात 65–90 कॅलरी असतात

या कॅलरी कमी करण्यासाठी किती चालावे? हे तुमचे वजन, चालण्याचा वेग आणि कालावधी यावर अवलंबून असते

साधारण 60–75 किलो वजनाच्या व्यक्तीसाठी 50 कॅलरी खर्च करण्यासाठी सुमारे 10–15 मिनिटे म्हणजे 1 ते 1.2 किमी वेगाने चालावे लागेल

70 कॅलरी खर्च करण्यासाठी सुमारे 15–20 मिनिटे म्हणजे 1.5 किमी चालावे लागले

90 कॅलरी खर्च करण्यासाठी सुमारे 20–25 मिनिटे म्हणजे साधारण 2 किमी चालावे लागेल

चहामधील साखर कमी करणे किंवा साखरेशिवाय चहा पिणे हा कॅलरी कमी करण्याचा सोपा मार्ग आहे

नियमित 30–45 मिनिटे वेगाने चालणे, संतुलित आहार आणि पुरेशी झोप यांचा एकत्रित फायदा कॅलरी कमी होण्यासाठी होतो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

येथे क्लिक करा