Weight Loss Exercise | सकाळी की संध्याकाळी? वजन झपाट्याने कमी करण्यासाठी व्यायाम कधी करावा?

पुढारी वृत्तसेवा

वजन कमी करण्यासाठी कार्डिओ, स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा एचआयआयटी (HIIT) यांसारख्या व्यायाम प्रकारांची निवड महत्त्वाची मानली जाते

संशोधनानुसार तुम्ही व्यायाम कधी करता, याचाही शरीरातील चरबी जाळण्याच्या आणि चयापचय (मेटाबॉलिझम) नियंत्रित ठेवण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो

अलीकडील सर्वांसाठी एकच वेळ योग्य ठरते, असे नसले तरी काही ठळक निष्कर्ष समोर आले आहेत

अनेक अभ्यासांनुसार सकाळी, विशेषतः सकाळी ७ ते ९ या वेळेत व्यायाम केल्यास वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते

समान प्रमाणात व्यायाम करूनही सकाळी व्यायाम करणाऱ्या व्यक्तींमध्ये पुढील सकारात्मक परिणाम दिसून आले

सकाळी व्यायाम करणाऱ्यांचा लठ्ठपणाचा धोका ३५ टक्क्यांनी कमी, हृदयविकाराचा धोका ३१ टक्क्यांनी कमी झाला

टाइप-२ मधुमेहाचा धोका ३० टक्क्यांनी कमी, तर उच्च कोलेस्टेरॉलचा धोका २१ टक्क्यांनी कमी आणि उच्च रक्तदाबाचा धोका १८ टक्क्यांनी कमी झाला.

सकाळच्या वेळेत व्यायाम करणाऱ्या व्यक्तींचा बॉडी मास इंडेक्स (BMI) आणि कंबरेचा घेर इतरांच्या तुलनेत कमी आढळून आला आहे

विशेषतः सकाळी नाश्त्यापूर्वी आणि नियमितपणे व्यायाम केल्यास हृदय व चयापचयाशी संबंधित अतिरिक्त फायदे मिळू शकतात

येथे क्लिक करा