पेरू खाण्याची योग्य वेळ कोणती? रात्री खाल्ल तर काय होतं?

पुढारी वृत्तसेवा

पेरुचे फायदे

व्हिटॅमिन C, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेला पेरू शरीरासाठी फायदेशीर मानला जातो.

Guava | Pudhari

भरपूर पोषक घटक

100 ग्रॅम पेरूमध्ये कार्बोहायड्रेट – 14.3 ग्रॅम, फायबर – 5.4 ग्रॅम, पोटॅशियम – 417 मिग्रॅ, व्हिटॅमिन C – 228 मिग्रॅ.. म्हणजेच हे फळ पोषणाचा खजिना आहे.

Guava | Pudhari

रोगप्रतिकारशक्ती वाढवतो

पेरूमध्ये संत्र्यापेक्षा जवळपास चार पट जास्त व्हिटॅमिन C असते. यामुळे सर्दी, खोकला आणि संसर्गांपासून शरीराचे संरक्षण होते.

Guava | Pudhari

पचनासाठी उत्तम

पेरूमधील फायबर पचनसंस्था सुरळीत ठेवते. यामुळे बद्धकोष्ठता कमी होते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते.

Guava | Pudhari

हृदयासाठी फायदेशीर

पेरू खाल्ल्याने वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यासही मदत होते.

Guava | Pudhari

वजन कमी करण्यासाठी उपयोगी

पेरू कमी कॅलरी आणि जास्त फायबरयुक्त असल्याने पोट भरल्या सारखं वाटतं आणि जंक फूड खाण्याची इच्छा कमी होते.

Guava | Pudhari

डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगलं

पेरूमध्ये असलेले व्हिटॅमिन A डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.

Guava | Pudhari

जास्त खाल्ल्यास त्रास होऊ शकतो

जास्त पेरू खाल्ल्यास बद्धकोष्ठता, पोटफुगी आणि रक्तातील साखर वाढण्याचा धोका असतो.

Guava | Pudhari

पेरू खाण्याची योग्य वेळ

तज्ञांच्या मते पेरू जेवणाच्या मधल्या वेळेत खाणे उत्तम. विशेषतः मिड-मॉर्निंग किंवा दुपारी स्नॅक म्हणून खाल्ल्यास शरीराला जास्त फायदा होतो.

Guava | Pudhari

रात्री पेरू खाणे टाळा

रात्री पेरू खाल्ल्यास काही लोकांना सर्दी, कफ किंवा पचनाच्या समस्या होऊ शकतात. म्हणून पेरू वेळेत खाणे अधिक योग्य मानलं जात.

Guava | Pudhari

सावधान! या 6 लोकांनी चुकूनही पिऊ नका ऊसाचा रस; नाहीतर...

Sugarcane juice | Pudhari
येथे क्लिक करा