Anirudha Sankpal
जेवणाची वेळ ठरवू शकते तुमचं आयुष्य? अमेरिकेतील 31 हजारांहून अधिक लोकांवरील संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
सकाळचा नाश्ता 7 ते 8 वाजता करणं फायदेशीर असल्याचं संशोधनात आढळलं आहे.
सकाळी 8 ते 10 दरम्यान पहिलं जेवण घेणाऱ्यांमध्ये मृत्यूचा धोका 10% अधिक आढळला.
सकाळी 10 ते दुपारी 12 दरम्यान नाश्ता किंवा पहिले जेवण करणाऱ्यांमध्ये हा धोका 19%, तर दुपारी 12 नंतर खाणाऱ्यांमध्ये 29% अधिक होता.
दुपारनंतर पहिलं जेवण घेणाऱ्यांची वयाच्या 50व्या वर्षी सरासरी आयुर्मर्यादा सुमारे 2.46 वर्षांनी कमी आढळली.
रात्री उशिरा किंवा मध्यरात्रीनंतर जेवणाऱ्यांमध्ये मृत्यूचा धोका 27% अधिक, तर आयुर्मर्यादा सुमारे 2.35 वर्षांनी कमी आढळली.
संशोधनानुसार रात्रीचं शेवटचं जेवण सुमारे रात्री 8 वाजता करणाऱ्यांमध्ये मृत्यूचा धोका सर्वात कमी होता.
जेवणाची वेळ आणि आयुर्मान यांचा संबंध आढळला आहे मात्र कारण-परिणाम सिद्ध झालेला नाही.