Best Fragrant Rose Water|गुलाब जल बनवण्यासाठी कोणत्या जातीचे गुलाब वापरले जाते?

पुढारी वृत्तसेवा

१) गुलाबजल (Rose Water), अत्तर बनवण्यासाठी 'दमास्क गुलाब' ही जात सर्वोत्तम आहे.

Damask Rose चे शास्त्रीय नाव Rosa damascena असे आहे.

भारतात या गुलाबाला 'देसी गुलाब', 'चैती गुलाब' किंवा 'कन्नौज गुलाब' म्हणून ओळखले जाते.

याचा सुवास अत्यंत तीव्र, टिकणारा असून नैसर्गिक तेलाचे प्रमाण जास्त असते.

याच्या पाकळ्या खाण्यायोग्य असून परफ्यूम, हर्बल टी, गुलकंदसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो.

२) देसी गुलाब-महाराष्ट्रात, भारतात सहज मिळणारा सुवासिक गुलाबी/लाल गुलाब.

नैसर्गिक सुगंधी घटक जास्त असतात, म्हणून गुलाबजलासाठी हा उत्तम मानला जातो.

३) सेंच्युरी गुलाब (Cabbage/May Rose)-फ्रान्स, युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरला जातो.

याच्या पाकळ्या दाट असतात आणि सुवास गोड असतो.

मसालेदार कटिंग चहाच नव्हे! भारतात प्रसिद्ध आहेत 'हे' चहाचे प्रकार; चव घेतल्याशिवाय राहवणार नाही