पुढारी वृत्तसेवा
खोबरेल तेलात फॅटी अॅसिड्स असतात, जे केसांच्या मुळांना खोलवर पोषण देतात आणि केस गळणे कमी करतात.
एरंडेल तेल रक्ताभिसरण सुधारते. यामुळे टाळूला पोषण मिळते आणि केसांची वाढ चांगली होते.
बदाम तेलात भरपूर व्हिटॅमिन E असते, जे केस तुटणे आणि कोरडेपणा कमी करते.
आयुर्वेदानुसार भृंगराज तेल केसगळती थांबवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते.
आवळा तेल केसांच्या मुळांना बळकटी देतो आणि अकाली पांढरे होणे कमी करतो.
कांद्याच्या तेलातील सल्फर केसांच्या मुळांना मजबूत करून गळती कमी करते.
मोहरी तेल कोमट करून लावल्यास टाळू सक्रिय होते आणि केसगळती नियंत्रणात येते.
आठवड्यातून 2–3 वेळा हलक्या हाताने गोलाकार हालचालीत मालिश करा, त्यामुळे तेलाचा परिणाम अधिक चांगला होतो.
फक्त तेल लावून उपयोग होत नाही. आहारात प्रथिने, लोह, व्हिटॅमिन E युक्त अंडी, पालेभाज्या व सुका मेवा जरूर घ्या.