पुढारी वृत्तसेवा
करिअर निवडणे हा जीवनातील सर्वात महत्त्वाचा निर्णय असतो. विद्यार्थी त्यांच्या आवडीनिवडी आणि गरजा यांचा योग्य समतोल साधतात तेव्हा यश निश्चितच मिळते.
सर्वप्रथम तुम्हाला कोणत्या विषयांपासून प्रेरणा मिळते. कोणते उप्रकम, छंद तुम्हाला उत्साही बनवतात, हे समजून घ्या.
तुमच्या बलस्थानांचे आणि नैसर्गिक कौशल्यांचे मूल्यांकन करा. कारण, ज्या गोष्टीत तुम्ही चांगले आहात, ती केल्याने यश आणि समाधान मिळण्याची शक्यता वाढते.
जाणून घेवूया मागील काही वर्षांमध्ये उत्तम पगाराच्या नोकर्या देणारे अभ्यासक्रम
डिजिटल मार्केटिंग अभ्यासक्रम ब्रँड्सना ऑनलाइन वाढण्यास मदत करतो. सध्या यामध्ये गती असणार्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते.
डेटा सायन्स मोठ्या डेटाचे रूपांतर महत्त्वाच्या निर्णयांमध्ये करते. उच्च वेतन देणारा हा अभ्यासक्रम आहे.
फॅशन स्टाइलिंगच्या माध्यमातून ब्रँड्सना स्टाइल करून सर्जनशीलपणे कमाईची संधी उपलब्ध करुन देतो.
विशेष कृषी तंत्रज्ञान (Agri-Tech) हा अभ्यासक्रम उच्च मागणी असलेल्या कौशल्यांसह शेतीचे आधुनिकीकरणास मदत करतो.
सायबर सिक्युरिटी सिस्टीमचे हॅकर्सपासून संरक्षण करते आणि सर्वाधिक कमाई मिळवून देण्याची क्षमता या अभ्यासक्रमात आहे.