पुढारी वृत्तसेवा
पावसाळ्यात सर्दी, खोकला आणि घशातील खवखव टाळण्यासाठी आलं चहा फायदेशीर ठरू शकतो. त्याचा उबदार स्वाद शरीराला आराम देतो.
तुळशीमध्ये अँटिऑक्सिडंट आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे गुणधर्म असतात. पावसाळ्यात संसर्गांपासून बचावासाठी हा चहा लोकप्रिय आहे.
हळदीतील कर्क्युमिन शरीरातील दाह कमी करण्यास मदत करू शकते. पावसाळ्यात हा चहा शरीराला आतून उब देतो.
दालचिनीचा सुगंध मन प्रसन्न करतो. तसेच पचन सुधारण्यास आणि शरीर गरम ठेवण्यास मदत करू शकतो.
ताजेतवाने सुगंध असलेला लेमनग्रास चहा थकवा दूर करण्यास आणि मूड सुधारण्यास मदत करू शकतो.
हर्बल टी शरीराला हायड्रेट ठेवण्यास, घशाला आराम देण्यास आणि ऋतूजन्य आजारांचा धोका कमी करण्यास मदत करू शकतो.
दिवसभरात 1 ते 2 कप हर्बल टी पुरेसा असतो. कोणत्याही गोष्टीचे अति सेवन टाळावे.
ताजे आले, तुळस, लेमनग्रास किंवा दालचिनी वापरल्यास चहा अधिक स्वादिष्ट आणि सुगंधी बनतो.
खिडकीत बसून गरमागरम हर्बल टीचा आस्वाद घेत पावसाळ्याचा आनंद अधिक खास बनवता येतो.