Anirudha Sankpal
पावसाळ्यात पचनशक्ती मंद असल्याने पचायला हलकी आणि इम्युनिटी वाढवणारी फळे खावीत.
जांभूळ पचनास मदत करते आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यास फायदेशीर ठरते.
डाळिंब हिमोग्लोबिन वाढवते, तर पपईतील 'पपेन' एन्झाइम पचनक्रिया सुरळीत ठेवते.
सफरचंद पचनसंस्था बळकट करते आणि नाशपाती (पेअर) रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
आवळा हा व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत असून संसर्गापासून बचाव करतो.
फळांवर सूक्ष्मजीव असल्याने ती मिठाच्या किंवा स्वच्छ पाण्याने धुवूनच खावीत.
उघड्यावरील आणि आधीच कापून ठेवलेली फळे खाणे जिवाणूंमुळे टाळावे.
नेहमी ताजी फळे योग्य प्रमाणातच खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.