Pre-Workout Food : व्यायामापूर्वी काय खावे? शरीराला झटपट ऊर्जा देतील 'ही' ७ फळे

पुढारी वृत्तसेवा

व्यायाम (वर्कआउट) सुरू करण्याच्या ३० ते ६० मिनिटे आधी कोणती फळे खाल्‍याने शरीरात ऊर्जा मिळते हे जाणून घेवूया....

स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी आणि झटपट ऊर्जेसाठी 'केळे' हा सर्वोत्तम प्री-वर्कआउट पर्याय आहे! पोटॅशियमने समृद्ध केळे आजच डाएटमध्ये समाविष्ट करा.

वर्कआउटदरम्यान थकवा जाणवतो? मग सफरचंद नक्की खा! यातील फायबर आणि नॅचरल कार्ब्स तुम्हाला दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देतात.

हाय-इंटेन्सिटी (जास्त क्षमतेचा) व्यायाम करायचा आहे? मग खजूर खाऊन शरीराला द्या 'इन्स्टंट फ्यूएल

व्हिटॅमिन 'सी' आणि पाण्याचा खजिना असणारी संत्री तुम्हाला व्यायामादरम्यान ताजेतवाने आणि उत्साही ठेवण्यास मदत करेल.

उन्हाळ्याच्या दिवसांत वर्कआउट करताना हायड्रेटेड राहण्‍यासाठी कलिंगड खा आणि शरीरातील पाण्याची कमतरता दूर करा.

नैसर्गिक शर्करांनी समृद्ध द्राक्षे तुमच्या शरीराला देतात क्विक एनर्जी बूस्ट.

अननसातील 'ब्रोमेलेन' घटक तुमच्या फिटनेस प्रवासात ठरेल फायदेशीर.

व्यायामाचा पुरेपूर फायदा मिळवण्यासाठी फळे वर्कआउटच्या ३० ते ६० मिनिटे आधीच खाणे फायदेशीर ठरते.

येथे क्‍लिक करा.