Dinner नंतर फक्त १० मिनिटे चाला;शरीरात होतील 'हे' मोठे बदल!

पुढारी वृत्तसेवा

रात्रीच्या जेवणानंतर फक्त १० मिनिटे चालणे तुमच्या संपूर्ण आरोग्यामध्ये लक्षणीय बदल घडवून आणू शकते.

जड व्यायामापेक्षा जेवणानंतर संथ गतीने फिरणे कधीही सोपे आणि शारीरिक-मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

जेवणानंतर चालल्यामुळे स्नायू ग्लुकोजचा वापर करतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar) अचानक वाढत नाही.

हलकी हालचाल तुमच्या पचनसंस्थेला गती देते, ज्यामुळे खाल्लेले अन्न पोटात आणि आतड्यांमध्ये सहज पचते.

रोज रात्री चालल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

चालण्यामुळे कॅलरीज बर्न होतात. संतुलित आहारासोबत रात्रीची ही १० मिनिटांची वॉक वजन कमी ठेवण्यास मदत करते.

रात्रीचे शांतपणे चालणे मन हलके करते. (टीप: झोपण्यापूर्वी लगेच खूप वेगाने चालणे टाळा, नाहीतर झोप उडू शकते!)

चालण्यामुळे शरीरात 'हॅपी हार्मोन्स' (Endorphins) तयार होतात. रात्री थोडा वेळ घराबाहेर फिरल्याने मनातील विचार शांत होतात.

नो जिम, नो खर्च! निरोगी आणि ॲक्टिव्ह राहण्यासाठी आजच रात्रीच्या जेवणानंतर १० मिनिटे चालण्याचा नियम बनवा.

येथे क्‍लिक करा.