shreya kulkarni
पावसाळा आला की मेकअपची चिंता सुरू होते. घाम आणि पावसामुळे चेहरा चिकट आणि काळपट दिसू लागतो. पण योग्य बेस निवडल्यास तुमचा लूक दिवसभर फ्रेश राहील.
पावसाळ्यात जड (Heavy) फाउंडेशन वापरणे टाळा. दमट हवामानामुळे ते चेहऱ्यावर चिकट वाटते, त्वचेची छिद्रे बंद करते आणि तुमचा लूक 'केक'सारखा (Cakey) दिसू शकतो.
BB (Beauty Balm) क्रीम हा एक उत्तम पर्याय आहे. हे हलके असते, त्वचेला मॉइश्चराइझ करते आणि हलके कव्हरेज देते. रोजच्या वापरासाठी आणि 'नो-मेकअप' लूकसाठी हे परफेक्ट आहे.
CC (Color Correcting) क्रीम त्वचेवरील लालसरपणा किंवा काळे डाग लपवून रंग एकसारखा करते. BB क्रीमपेक्षा थोडे जास्त कव्हरेज देते, पण फाउंडेशनपेक्षा हलके असते.
जर तुमची त्वचा स्वच्छ असेल आणि फक्त फ्रेश लूक हवा असेल तर BB क्रीम वापरा. पण चेहऱ्यावर डाग किंवा पिंपल्स असतील तर CC क्रीम तुमच्यासाठी अधिक चांगली आहे.
कोणतीही क्रीम निवडली तरी ती बोटांनी किंवा ओलसर स्पंजने लावा. यामुळे ती त्वचेत चांगली मिसळते आणि नैसर्गिक लूक मिळतो.
पावसाळ्यात तुम्ही BB किंवा CC क्रीम जे काही निवडाल, ते 'वॉटरप्रूफ' किंवा 'वॉटर-रेझिस्टंट' असल्याची खात्री करा. यामुळे मेकअप पावसातही टिकून राहील.
आता गोंधळ दूर झाला ना? या पावसाळ्यात हलका बेस मेकअप निवडा आणि आत्मविश्वासाने घराबाहेर पडा. तुमचा चेहरा दिवसभर चमकदार आणि फ्रेश दिसेल.