Diabetes Diet : 'डायबेटिस डाएट' ठरेल परफेक्ट! आहारात या पदार्थांचा समावेश करा

पुढारी वृत्तसेवा

योग्य आहार आणि जीवनशैलीने मधुमेहावर (Diabetes) नियंत्रण ठेवता येते.

canva photo

सॅल्मन, सार्डिन आणि मॅकरेलसारख्या माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिडचे प्रमाण भरपूर असते. हे घटक इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारतात.

पालेभाज्यांमध्ये कॅलरीज अत्यंत कमी असतात. त्या फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सने परिपूर्ण असल्‍याने मधूमेहींना लाभदायक ठरतात.

निरोगी फॅट्स आणि फायबरने समृद्ध असलेले ॲव्होकॅडो हे फळ दीर्घकाळ पोट भरल्याची भावना टिकवून ठेवते.

काळे चणे, हरभरे आणि मसूर यांसारखी कडधान्ये प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत आहेत. ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

भिजवलेल्या चिया बियांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.

ब्रोकोलीमध्ये जीवनसत्त्व सी, मॅग्नेशियम आणि पचण्यास सोपे असलेले कार्ब्स भरपूर प्रमाणात आढळतात.

ऑलिव्ह तेलातील (Olive Oil) ओलिक ॲसिड रक्तातील ग्लुकोज व्यवस्थापन सुधारते.

प्रोटीन आणि प्रोबायोटिक्सने परिपूर्ण असलेले न गोड केलेले ग्रीक योगर्ट रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

येथे क्‍लिक करा.