Wall Clock Direction | घरामध्ये घड्याळ लावण्यासाठी योग्य दिशा कोणती?

Namdev Gharal

वास्तूशास्त्रानुसार घरामध्ये घड्याळ लावताना दिशांची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण घड्याळ हे प्रगती आणि काळाचे प्रतीक आहे.

वास्तूशास्त्रानुसार चुकीच्या दिशेला लावलेले घड्याळ नकारात्मकता आणू शकते असे म्हटले जाते

उत्तर दिशा (North): ही दिशा सर्वोत्तम मानली जाते, कारण ती कुबेराची दिशा मानली जाते. उत्तर भिंतीवर घड्याळ लावल्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते आणि आर्थिक प्रगतीचे मार्ग मोकळे होतात.

पूर्व दिशा : ही इंद्राची आणि सूर्याची दिशा आहे. पूर्व दिशेला घड्याळ लावल्याने घरातील सदस्यांचे आरोग्य सुधारते आणि समाजात मानसन्मान मिळतो.

ईशान्य कोपरा (North-East): ही दिशा देखील घड्याळासाठी अत्यंत शुभ मानली जाते.

कोणत्या दिशेला घड्याळ लावू नये? दक्षिण दिशा (South): दक्षिण दिशा ही 'यम' धर्माची मानली जाते. या दिशेला घड्याळ लावल्याने कामात अडथळे येतात

घराच्या कोणत्याही मुख्य दरवाजाच्या किंवा बेडरूमच्या दरवाजाच्या बरोबर वर घड्याळ लावू नये. यामुळे घरात तणाव वाढतो.

बंद घड्याळ: घरात कधीही बंद पडलेले घड्याळ ठेवू नका. ते त्वरित दुरुस्त करा किंवा काढून टाका, कारण बंद घड्याळ प्रगती थांबवण्याचे लक्षण मानले जाते.

स्वच्छता: घड्याळावर धूळ साचू देऊ नका. ते नेहमी स्वच्छ ठेवावे. घड्याळ कधीही वेळेच्या मागे नसावे. ते योग्य वेळेवर किंवा २-३ मिनिटे पुढे असले तरी चालेल.

काच फुटलेले घड्याळ: फुटलेली काच असलेले घड्याळ घरात ठेवणे अशुभ मानले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Calcium Deficiency | तुमचीही सतत कंबर दुखते का, हातपाय किंवा दात दुखतात का?