गळ्यात चांदीची चेन घालण्याचे ५ फायदे

मोहन कारंडे

हिंदू धर्मात प्रत्येक धातूचे विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, कोणतीही वस्तू एखाद्याच्या राशी आणि ग्रहांनुसार परिधान करावी. तरच त्याचे शुभ परिणाम दिसतात, असे मानले जाते.

आजकाल फॅशनमुळे मुली गळ्यात चांदीच्या चेन घालतात. यामुळे सौंदर्य वाढते, पण तुम्हाला गळ्यात चांदीची साखळी घालण्याचे फायदे माहित आहेत का?

चांदीचा चंद्राशी संबंध असल्याचे म्हटले जाते. जो मनाला शांत करतो. चेनमुळे तणाव आणि चिंता कमी होते.

हिंदू संस्कृतीतही चांदीला अतिशय पवित्र आणि ऊर्जावान धातू मानले जाते. चांदी नकारात्मक ऊर्जा घालवून सकारात्मक ऊर्जेला आकर्षीत करतो.

शरीर सकारात्मक ठेवण्यासोबतच, ते चांगले आरोग्य राखण्यास देखील मदत करते. शरीराचे तापमान संतुलीत राहते.

सोमवारी चांदीची चेन घाला. प्रथम गंगाजलाने चेन शुद्ध करा आणि नंतर ती तुमच्या गळ्यात घाला.

नाते मजबूत होते

जर तुमचे कुटुंब, मित्र किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीशी चांगले संबंध नसतील तर अशा लोकांनी नक्कीच चांदीची साखळी घालावी. चांदीची साखळी तुमच्या लोकांशी मजबूत नाते निर्माण करण्यास मदत करते, असे सांगितलं जातं.

मंगळ असेल तर ठरेलं लाभदायक

जर तुमच्या कुंडलीत मंगळ कमकुवत असेल तर तुम्ही चांदीची साखळी घालावी. यामुळे तुमचा मंगळ चांगले फळ देऊ लागतो, असं मानलं जातं.

संपत्ती आणि समृद्धी

शुक्ल पक्षात चांदीची साखळी घातल्याने धन आणि समृद्धी मिळते. हे आर्थिक स्थिरतेला प्रोत्साहन देते.

कान्समध्ये अलिया भट्टची साडीत ठसकदार एंट्री