Benefits Of Shikakai: केसांसाठी शॅम्पू नाही तर आजीच्या बटव्यातील 'शिकाकाई' वापरण्याचे मोठे फायदे

Anirudha Sankpal

जुन्या काळात आपल्या घरातील महिला या केस साफ करण्यासाठी घरातीलच वस्तूंचा वापर करत होत्या.

म्हातारपणातही घनदाट

त्यामुळेच त्यांचे केस म्हातारपणात देखील घनदाट आणि लांब होते. कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या त्यांना भेडसावली नाही.

Hair Care Tips | Canva

शिकाकाईची जादू

आपल्या घरातील बुजूर्ग महिला या त्यांच्या केसांना शिकाकाई आणि रीठा लावत होत्या. त्याची जादू काही औरच आहे.

रीठा अन् शिकाकाई म्हणजे काय?

रीठा हे एका झाडाचे फळ आहे. त्याच्या सालापासून सैपोनिन नवाचे एक तत्व सापडते. ते पाण्यात मिसळल्यावर हलका फेस होऊन साबणासारखा प्रभाव निर्माण होतो.

शिकाकाई

शिकाकाईचे वैज्ञानिक नाव हे अकेसिया कन्सिन्ना असं आहे. ही एक झुडपाची फळे असतात त्याचा पीएच स्तर समतोल असतो.

केस स्वच्छ होतात

शिकाकाई आणि रीठा केसांना लावल्यानंतर त्यातील धूळ, माती अन् घाण साफ होते. त्यामुळं खाज सुटण्यासारख्या समस्या उद्धवत नाहीत.

केस सिल्की होतात

केसांना सिल्की करण्यासाठी महागड्या कंडशनिरचा वापरा पेक्षा रीठा अन् शिकाकाई प्रभावी आहे. रीठा आणि शिकाकाईच्या पावडरमध्ये लिंबूचा रस मिसळून तो लावल्यावर केस सिल्की होतील.

केस गळती कमी

केसांना केमिकल लागले नाही आणि स्कॅल्पला पोषण मिळाल्यानंतर केस गळती कमी होते. शिकाकाई आणि रीठा केसांना मुळापासून मजबूत करते.

Hair Health Diet | file photo

डँड्रफपासून सुटका

रीठा शिकाकाई केसात होणाऱ्या डँड्रफपासून सुटका मिळवून देते. तसेच केसात होणारी खाज देखील रीठा आणि शिकाकाई वापराने कमी होते.

केसाची चांगली वाढ

शिकाकाई आणि रीठा हे केसांच्या वाढीसाठी उत्तम मानण्यात आली आहे. यातील व्हिटॅमीन आणि पोषक तत्वे रक्तप्रवाह सुधारतात अन् केसांना मजबूती देतात.

येथे क्लिक करा