Ganesha Idol : विहिरीतून प्रकट झालेल्या गणेशमूर्तीचा वाढतोय आकार

पुढारी वृत्तसेवा

एक अनोखे आणि अद्भुत मंदिर

आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात असलेले 'कनिपकम श्री वरसिद्धी विनायक मंदिर' हे देशातील सर्वात रहस्यमय आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक मानले जाते.

विहिरीच्या मध्यभागी विराजमान गणपती

या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील गणपती बाप्पा चक्क एका जिवंत विहिरीच्या पाण्याच्या मध्यभागी विराजमान आहेत.

तीन दिव्यांग भावांची आख्यायिका

स्थानिक आख्यायिकेनुसार, प्राचीन काळात तीन दिव्यांग भावंडांनी (मूक, बधिर आणि अंध) शेतातील पाण्यासाठी विहीर खोदण्यास सुरुवात केली होती.

स्वयंभू बाप्पाचे प्रकटीकरण

विहीर खोदताना अचानक बाप्पाची ही स्वयंभू मूर्ती प्रकट झाली आणि त्या क्षणी घडलेल्या चमत्काराने सर्वांना थक्क केले.

आजही मूर्ती पाण्यामध्येच!

शतके लोटली तरीही आजही श्रीगणेशाची ही मूर्ती मूळ विहिरीच्या पाण्याचा मध्यभागी त्याच जागी स्थानापन्न आहे.

निसर्गाचा थक्क करणारा चमत्कार

या मंदिरातील गणेशमूर्तीचा आकार दरवर्षी आपोआप वाढतो, अशी लाखो भाविकांची गाढ श्रद्धा आणि दावा आहे.

चांदीचे कवच पडते लहान!

मूर्तीचा आकार वाढत असल्याने तिला अर्पण केलेले चांदीचे कवच (कवचम) काही वर्षांनंतर लहान पडू लागते.

नवे मोठे कवच बसवण्याची परंपरा

कवच लहान पडल्यामुळे मंदिराच्या प्रशासनाला ठरावीक वर्षांच्या अंतराने मूर्तीसाठी मोठे चांदीचे कवच तयार करून बसवावे लागते.

देश-विदेशातून भाविकांची मांदियाळी

हा अद्‌‌भुत चमत्कार प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवण्यासाठी आणि बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दरवर्षी देशभरातून लाखो भाविक कनिपकम येथे हजेरी लावतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.