पुढारी वृत्तसेवा
वांगे हे आपल्या आहारातील एक महत्त्वाची भाजीपाला आहे. त्यात अनेक पौष्टिक गुणधर्म आहेत
१०० ग्रॅम वांग्यामध्ये कॅलरी: 25–26 kcal, कार्बोहायड्रेट: 5–6 ग्रॅमफायबर: 2–3 ग्रॅम, प्रथिने: 1 ग्रॅम, फॅट: अत्यल्प, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन B6, C, K, फोलेट आदी पोषक घटक असतात
वांग्यात “अँथोसायनिन” नावाचे अँटीऑक्सिडंट असतात, हे खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यात मदत करतात, त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते
फायबर जास्त असल्यामुळे साखरेचे शोषण हळूहळू होऊन रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते
कमी कॅलरी + जास्त फायबर, त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते, वजन कमी करण्यासाठी उत्तम भाजी मानली जाते
फायबरमुळे आतड्यांची हालचाल सुधारून पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते
“नॅसुनिन” नावाचा अँटीऑक्सिडंट मेंदूच्या पेशींचे संरक्षण करतो, त्यामुळे स्मरणशक्ती व मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते
वांग्यातील काही जैविक संयुगे (SRGs) कर्करोग पेशींवर प्रभाव टाकतात, त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते
लोह आणि इतर खनिजांमुळे अॅनिमिया (रक्तअल्पता) कमी करण्यास मदत, रक्तनिर्मितीस मदत होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, अँटीऑक्सिडंट्समुळे शरीरातील पेशींचे संरक्षण होते