Eating Dates: साखर सोडलीये... नैसर्गिक आहे म्हणून रोज खजूर खाताय; सावधान!

Anirudha Sankpal

खजूर पौष्टिक आणि नैसर्गिक असले तरी, ते 'अनलिमिटेड' खाणे आरोग्यासाठी योग्य नाही.

चमकदार त्वचा आणि निरोगी पचनासाठी रोज खा खजूर... | File Photo

खजुरामध्ये नैसर्गिक साखरेसोबतच फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, मात्र त्यात कार्ब्स आणि कॅलरीजही भरपूर असतात.

Dates during periods

वजन कमी करताना गोड खाण्याची तीव्र इच्छा (Cravings) झाल्यास, चॉकलेटऐवजी एक ते दोन खजूर खाणे हा उत्तम पर्याय आहे.

Dates during periods

खजूर खाण्यासाठी सकाळ किंवा रात्रीचा असा कोणताही कडक नियम नाही; तो स्नॅक म्हणून किंवा व्यायामाच्या आधी-नंतर घेता येतो.

Dates during periods

डायबेटिस असलेल्यांनी खजूर पूर्ण बंद करण्याची गरज नाही, मात्र ब्लड शुगर वाढू नये यासाठी तो मर्यादित प्रमाणातच खावा.

Benefits of dates during periods | Canva photo

शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी खजूर शक्यतो एकटा न खाता बदाम, अक्रोड किंवा जेवणासोबत घ्यावा.

Benefits of dates during periods | Canva photo

डेट सिरप किंवा डेट पेस्ट वापरल्याने खजुरातील शुगर कमी होत नाही, त्यामुळे या स्वरूपात खजूर खाणे टाळावे.

Dates during periods

आहार हे औषधासारखा असून खजुराचे प्रमाण योग्य राखल्यास तो आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतो.

Benefits of dates during periods | Canva photo
येथे क्लिक करा