पुढारी वृत्तसेवा
चांगल्या आणि शांत झोपेसाठी आहारामध्ये योग्य फळांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे.
अननसामध्ये 'मेलाटोनिन' घटक चांगल्या प्रमाणात असतो, यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते.
केळातील पोषक घटक स्नायूंना आराम देतात आणि 'सेरोटोनिन' तसेच 'मेलाटोनिन' या महत्वाचे नैसर्गिक रासायनिक पदार्थ निर्मितीला प्रोत्साहन देतात.
किवीचे (Kiwi) झोपण्यापूर्वी सेवन केल्याने झोपेची गुणवत्ता आणि कालावधी यावर सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण परिणाम होतो असे मानले जाते.
बेरीज हे 'मेलाटोनिन' आणि अँटिऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहेत. ते चांगली झोप लागण्यासाठी मदत करतात.
पॅशन फ्रूट (Passion fruit)मधील संयुगे शरीराला आराम देतात. यामुळे ते झोपेसाठी उपयुक्त ठरते.
संत्री 'व्हिटॅमिन सी' चा हा एक उत्तम स्रोत आहे. शरीराला हायड्रेटेड ठेवतात आणि पचन करणाऱ्या एन्झाईम्सना उत्तेजित करतात.
द्राक्षांमध्ये नैसर्गिकरित्या 'मेलाटोनिन' असते. हे संप्रेरक (Hormone) आपल्या झोप-जागण्याच्या चक्राचे नियमन करते.
पपईमध्ये असणारी 'कोलीन', 'मॅग्नेशियम' आणि 'बी जीवनसत्त्वे' यांसारख्या पोषक तत्व झोपेसाठी फायदेशीर ठरते.
टीप: ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी असून ती इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.